

Sonam Wangchuk narendra modi
esakal
Modi Government Anti Paper Leak Bill : सोनम वांगचुक यांनी नीट पेपर लीक प्रकरणी मोदी सरकारच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत २६ दिवस उपोषण केले होते. आता केंद्र सरकारने परीक्षा पेपरफुटीविरोधात उचललेल्या पावलांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर काश्मीरमध्ये एक दिवस विश्रांती घेत लडाखकडे परतताना वांगचुक यांनी संसदेत पेपरफुटीविरोधी विधेयक आणल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच या दिशेने सुधारणा सुरूच राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यासोबतच, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, या सरकारच्या आश्वासनाचे पालन करण्याची मागणीही त्यांनी केली.