Coronavirus : सोनिया गांधीचे मोदींना पत्र; केली 'ही' मोठी मागणी

वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचं समर्थन केले आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. अशात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचं समर्थन केले आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोनिया गांधी यांनी मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'या कठिण काळात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घेण्यात यावी. तसेच उद्योग जगतासोबत सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळावा. लोकांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवठा साखळी मजबूत करा. तसेच केंद्र सरकारने सर्व EMIवर ६ महिन्यांपर्यंत स्थगिती देण्यात यावी, अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, सोनिया गांधी यांनी या काळात बँकांचे व्याजही माफ करण्याचा पर्याय त्यांनी पत्राद्वारे सुचवला आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोकांना त्यानुसार आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. काँग्रेसचा सरकारला पूर्णपणे पाठिंबा असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

तत्पूर्वी, लॉकडाउन जाहीर करताना मोदी यांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापने बंद राहणार असल्याचे सांगितले होते. कोरोना व्हायरसची साखळी मोडून काढण्यासाठी हे २१ दिवस महत्वाचे आहेत. त्यामुळे कोणीही घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi has written to Prime Minister with suggestions