Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

Sonia Gandhi’s reaction on MGNREGA Name Change : जारी केला व्हिडिओ संदेश, जाणून घ्या, सोनिया गांधींनी नेमकं काय म्हटलंय?
Sonia Gandhi delivering a video message addressing the controversy surrounding the MGNREGA name change and its impact on rural employment schemes.

Sonia Gandhi delivering a video message addressing the controversy surrounding the MGNREGA name change and its impact on rural employment schemes.

esakal

Updated on

Congress reaction MGNREGA name change : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात "व्हीबी-जी राम जी" विधेयक सादर केले गेले आणि हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूरही झाले आहे. केंद्रातील एनडीए सरकारने ‘मनरेगा’ची जागा घेण्यासाठी हे "व्हीबी-जी राम जी" विधेयक आणले आहे. ज्यास काँग्रेससह विरोधी पक्षांनी जोरदर विरोध दर्शवलेला आहे.

मात्र हे विधेयक मंजूर झाले यानंतर आता, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. सोनिया गांधींनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात २० वर्षांपूर्वी सादर केलेल्या मनरेगा कायद्याचे वर्णन एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे केले आहे. तर, नवीन कायद्याबाबत, सोनिया गांधी म्हणाल्या की, सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला आहे. आता कुणाला, किती, कुठे आणि कशाप्रकारे रोजगार मिळेल, हे जमिनीच्या वास्तवापासून दूर असलेले दिल्लीत बसलेले सरकार ठरवेल

सोनिया गांधी म्हणाल्या, "मला अजूनही आठवते की २० वर्षांपूर्वी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना संसदेत मनरेगा कायदा एकमताने मंजूर झाला होता. हे एक क्रांतिकारी पाऊल होते ज्याचा फायदा लाखो ग्रामीण कुटुंबांना झाला. ते उपजीविकेचे साधन बनले, विशेषतः वंचित, शोषित, गरीब आणि अत्यंत गरीबांसाठी. रोजगारासाठी आपल्या जन्मभूमी, गाव, घर आणि कुटुंबातून स्थलांतर थांबवण्यात आले. रोजगाराचा कायदेशीर अधिकार देण्यात आला आणि ग्रामपंचायतींना सक्षम करण्यात आले. मनरेगाच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या भारतातील ग्राम स्वराजच्या स्वप्नाकडे एक ठोस पाऊल उचलण्यात आले.

Sonia Gandhi delivering a video message addressing the controversy surrounding the MGNREGA name change and its impact on rural employment schemes.
Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

यावेळी सोनिया गांधी यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, "गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने ग्रामीण भागातील बेरोजगार, गरीब आणि वंचितांच्या हितांकडे दुर्लक्ष करून मनरेगा कमकुवत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. खरंतर कोविडच्या काळात हे गरिबांसाठी उपजीविकेचे साधन बनले होते. ते जीवनरेखा ठरले. परंतु अत्यंत खेदाची बाब आहे की, सरकारने अलीकडेच मनरेगावर बुलडोझर चालवले आहे.

Sonia Gandhi delivering a video message addressing the controversy surrounding the MGNREGA name change and its impact on rural employment schemes.
Tourist Bus Accident : पर्यटकांची मिनी बस चढावरून अचानक जाऊ लागली मागे; तरूणींनी जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या!

सोनिया गांधींनी असाही आरोप केल की,  केवळ महात्मा गांधींचे नाव वगळण्यात आलेच नाही, तर मनरेगाचे स्वरूपही चर्चा न करता, सल्लामसलत न करता आणि विरोधी पक्षांना विश्वासात न घेता मनमानीपणे बदलण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com