सोनिया गांधींनी लिहिले ईडीला पत्र; केली ही मागणी

Sonia Gandhi wrote a letter to ED
Sonia Gandhi wrote a letter to EDSonia Gandhi wrote a letter to ED

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी बुधवारी (ता. २२) अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र (letter) लिहून एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा अवधी मागितला आहे. कोरोना व फुफ्फुसाच्या संसर्गातून पूर्णपणे बरी होईपर्यंत आराम करू द्यावा, असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. (Sonia Gandhi wrote a letter to ED)

कोरोना आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी बुधवारी ईडीला (ED) पत्र लिहून पूर्णपणे बरी होईपर्यंत हजेरी काही आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केल्याचे ट्विट काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले आहे.

Sonia Gandhi wrote a letter to ED
उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाहीत; राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली

सोनिया गांधी यांना सोमवारी (ता. २०) दिल्लीतील खाजगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. जिथे त्यांना कोरोना व्हायरसशी संबंधित गुंतागुंतींमुळे दाखल करण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासाला राजकीय सूडबुद्धी म्हणत काँग्रेसने तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे मंगळवारी पाचव्या दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ११ तासांहून अधिक चौकशी करण्यात आली. तपास एजन्सीने राहुल गांधींना कोणतेही नवीन समन्स जारी केलेले नाही. असे मानले जात आहेत की काही काळासाठी त्यांची चौकशी संपली आहे. राहुल गांधी यांची पाच दिवसांत ५४ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com