तुमचं मौन द्वेषाला बळ देतंय; विद्यार्थ्यांचं PM मोदींना खुलं पत्र | PM Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

तुमचं मौन द्वेषाला बळ देतंय; विद्यार्थ्यांचं PM मोदींना खुलं पत्र

नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) च्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एका खुल्या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना देशातील द्वेषयुक्त भाषण आणि जाती-आधारित हिंसाचाराच्या विरोधात बोलण्याचे आवाहन केले आहे. (speak up against hate speech and caste-based violence in the country) या पत्रावर आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम बंगळुरूच्या काही विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पंतप्रधानांचे मौन द्वेषपूर्ण आवाजांना प्रोत्साहन देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. याबाबत एनडी टिव्हीने वृत्त प्रकाशित केलं आहे. (IIM Student & Staff Member Letter To PM Modi )

हेही वाचा: फिरोजपुरमध्ये सापडली पाकिस्तानी बोट; जवळच अडकला होता PM मोदींचा ताफा

नुकतेच हरिद्वार येथील धर्म संसदेत (Haridwar Dharam Sansad ) द्वेषपूर्ण भाषणाचे प्रकरण समोर आले आहे. धर्म संसदेत, काही हिंदू धर्मगुरूंनी लोकांना मुस्लिमांविरुद्ध शस्त्रे उचलण्याचे आवाहन केले आणि नरसंहाराची हाक दिली होती. दरम्यान, धर्म/जातीय अस्मितेच्या आधारावर द्वेषयुक्त भाषण आणि समुदायांविरुद्ध हिंसाचाराचे आवाहन अस्वीकार्य आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. (Narendra Modi)

हेही वाचा: 'सत्तेच्या भुकेसाठी मोदींनी पुलवामा घटना घडवून आणली'

भारतीय राज्यघटनेने धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला असला तरी देशात भीतीचे वातावरण असल्याचे म्हटले आहे. त्यात असे लिहिले आहे की, 'आपल्या देशात आता भीतीचे वातावरण असून, अलीकडच्या काळात चर्चसह प्रार्थनास्थळांची तोडफोड केली जात आहे आणि आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींविरुद्ध शस्त्रे उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.' या पत्रावर आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम बंगळुरूच्या 183 विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी केली आहे, ज्यात 13 प्राध्यापकांचा समावेश आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top