दिल्लीत विमान विजेच्या खांबाला धडकलं

पायलट विमान मागे घेत असताना हा अपघात घडलाय.
spicejet
spicejetsakal

दिल्ली विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचं विमान विजेच्या खांबाला धडकलंय. विमान मागे घेत असताना हे विमान खांबाला धडकलयं. यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. स्पाईसजेट कंपनीचं विमान जे दिल्लीहून जम्मूसाठी उड्डाण करणार होते. विमानतळावरच एका खांबाला धडकलंय.

विमान रनवे वर घेत असताना हा अपघात घडला. विमानात प्रवासी असताना हि घटना घडल्याने मोठा अनर्थ टळलाय. या घटनेत विमानाच्या पंखांचे नुकसान झालंय. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची सोय करण्यात आलीय. तसंच या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं एअरपोर्ट ऑथोरिटींनी सांगितलं.

विमानाच्या उजव्या पंखाला विजेच्या खांबाला धडकल्याने मोठं नुकसान झालंय. बोइंग 737-800 प्रकाराचं हे विमान होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com