
स्पाईसजेटचा विमानात आज दुसरा बिघाड; विंडशील्डला गेला तडा
गुजरात : कंडल येथून मुंबईकडे उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेट (SpiceJet) विमानाच्या (plane) वरच्या विंडशील्डला (windshield) मंगळवारी (ता. ५) उड्डाण घेताना तडा गेला. ज्यामुळे विमानाला प्राधान्याने लँडिंग करावे लागले. स्पाइसजेटच्या विमानात बिघाड होण्याची आजची दुसरी घटना आहे. या विमानाला मुंबईत सुरक्षितपणे उतरवण्यात आले. आजच दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या SG-11 विमानाचे कराचीत (Karachi) इमरजन्सी लँडिंग करण्यात आले.
FL२३० येथे उड्डाणाच्यावेळी P२ बाजूच्या विंडशील्डचा बाह्यभाग तुटला. यादरम्यान दबाव सामान्य होता. विमानाला मुंबईत (mumbai) सुरक्षित उतरवण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे एअरलाइनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत स्पाइसजेट विमानातील सुरक्षिततेशी संबंधित ही तिसरी घटना आहे. सर्व घटना नियामकाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. इतर घटना दाराचा इशारा (डोर वॉर्निंग), पक्ष्यांची टक्कर, इंजिनमधून तेल गळती आदींशी संबंधित होत्या.
हेही वाचा: दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग
विमान (plane) वाहतूक नियामक महासंचालनालयाने (DGCA) गेल्या महिन्यातच स्पाइसजेट विमानाचे सर्वसमावेशक सेफ्टी ऑडिट केले होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या घटनेपूर्वी दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाला इंडिकेटर लाइटमध्ये बिघाड झाल्यामुळे कराचीच्या दिशेने वळवावे लागले होते.
स्पाईसजेटच्या (SpiceJet) B७३७ विमानाचे फ्लाइट SG-११ (दिल्ली-दुबई) इंडिकेटर लाइटमध्ये बिघाड झाल्यामुळे ५ जुलै २०२२ रोजी कराचीच्या दिशेने वळवण्यात आले होते. विमान कराचीमध्ये सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यावेळी कोणतीही आणीबाणी घोषित करण्यात आली नाही. तसेच विमानाने सामान्य लँडिंग केले, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले होते.
Web Title: Spicejet Plane Cracked Windshield Mumbai Landing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..