esakal | सुप्रीम कोर्टचे अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, न्यायाधीशांचे 'वर्क फ्रॉम होम'

बोलून बातमी शोधा

supreme court.jpg

सर्वोच्च न्यायालयाची सर्व खंडपीठे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुरु होणार आहेत.

सुप्रीम कोर्टचे अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, न्यायाधीशांचे 'वर्क फ्रॉम होम'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. आता सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयातील अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आपल्या निवासस्थानातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाधित झालेले अनेक कर्मचारी हे अनेक न्यायमूर्तींच्या कार्यालयाशी निगडीत आहेत. शनिवारी सर्वोच्च न्यायालयातील 44 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याचे सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयात सुमारे 3400 कर्मचारी कार्यरत आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. तर सर्वोच्च न्यायालयाची सर्व खंडपीठे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुरु होणार आहेत. दरम्यान, सोमवारीही भारतात कोरोनाचे सुमारे 1 लाख 70 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी उसळी आहे. मृतांचा आकडा ही भीतीदायक आहे. एकट्या सोमवारी देशभरातून 900 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- आतापर्यंत किती लशींचा देशात पुरवठा झाला? आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

भारतात धोकादायक स्तरावर कोरोना
देशात मागील आठवड्यात दररोज सरासरी 1,24,476 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या लाटेत एका दिवसात कमाल 97 हजारहून अधिक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. गेल्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी देशात पहिल्यांदाच 24 तासांच्या आत एक लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कालच्या रविवारी (दि.11) सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांमध्ये 1.52 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली होती. या आठवड्यात सात दिवसांपैकी सहा दिवस दररोज एक लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. जी भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक आहे. सध्या देशात बाधितांची संख्या दुप्पट होण्याचा काळ 60.2 दिवस आणि मृतांचा दुप्पट होण्याचा काळ 139.5 दिवस आहे.  

हेही वाचा- VIDEO: 'कोरोना देशातून निघून जा'; मंत्र्याने एअरपोर्टवर केली पूजा