तळीरामांसाठी चांगली बातमी; फक्त एवढेच करा...

वृत्तसंस्था
Friday, 8 May 2020

देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन असला तरी तळीरामांसाठी दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. पण, भर उन्हात दारुच्या दुकानांसमोर मोठ-मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. पण, यापुढे तळीरांमान दुकांनापुढे उभे राहण्याची आवश्यकता नाही.

नवी दिल्लीः देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन असला तरी तळीरामांसाठी दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. पण, भर उन्हात दारुच्या दुकानांसमोर मोठ-मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. पण, यापुढे तळीरांमान दुकांनापुढे उभे राहण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांना ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.

गर्भवती पत्नी; समोर चिमुकला अन्‌ दारूसाठी तडफड...

दिल्लीच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारने दारुच्या दुकानांबाहेरील लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे आता दिल्लीतल्या तळीरामांना घरबसल्या दारुसाठी बूकिंग करता येणार आहे. यासाठी दिल्ली सरकारने https://www.qtoken.in/ ही एक वेबसाइटची लिंक उपलब्ध करून दिली आहे. या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर दारु खरेदीसाठी जवळचं दुकान निवडावे लागेल. त्यानंतर तारीख आणि वेळ सांगितली जाईल. त्यावेळेमध्ये संबंधित व्यक्ती रांगेमध्ये उभे न राहता दुकानामध्ये जाऊन दारु खरेदी करु शकेल. टोकन दुकानात दाखवताना एक सरकारी ओळखपत्रही दाखवावे लागणार आहे. लॉकडाउनच्या नियमांचे पालन व्हावे आणि दुकानांसमोरील गर्दी कमी व्हावी यासाठी ही योजना दिल्ली सरकारने आणली आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने दारु विक्रीवर ‘विशेष करोना शुल्क’ही लावला आहे. त्यामुळे तळीरामांना दारु एमआरपीपेक्षा 70 टक्के जास्त महाग मिळत आहे. पण तरीही दारुच्या दुकानांबाहेरील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे सरकारने ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरू केली आहे.

Video: एवढी मोठी रांग कशासाठी असेल बरं...

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने 4 मे पासून लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी आणखी वाढवला. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य आणि तंबाखूची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली. रेड झोनमध्येही कन्टेंटन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी देताना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: starts e token system for liquor purchases to avoid crowding at delhi