बिहारमधून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 13 September 2020

देवेंद्र फडणवीस सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत. 

पटना : महाराष्ट्रात स्टेट स्पॉन्सर्ड टेररची परिस्थिती आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत. नौसेनेच्या अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेचा हवाला देत फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. एका माजी अधिकाऱ्याला अशाप्रकारे मारहाण करणे अत्यंत चुकीचे आहे. राज्यात सध्या राज्यपुरस्कृत दहशतवादसारखी परिस्थिती आहे. राज्यातील गुंडाराज लवकरात लवकर थांबवा, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विटच्या माध्यमातून केल्याचेही त्यांनी सांगितले.    

भारतात लशीची चाचणी पुन्हा सुरु करण्यास DGCI ची परवानगी - सीरम इन्स्टिट्यूट

फडणवीस म्हणाले की, नौसेनेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली गेली. जेव्हा मीडिया आणि आम्ही विरोधकांनी याप्रकरणी दबाव आणला तेव्हा कुठे 6 लोकांना अटक केली गेली. परंतु दहाच मिनिटांत त्यांना टेबल बेल देऊन सोडण्यात आलं. हे याप्रकारेच चालत राहीलं तर मला वाटतंय की, कुठे ना कुठे महाराष्ट्रात असे वातावरण तयार होत आहे की जे मी यापुर्वी कधी पाहिले नाहीये. महाराष्ट्र आता काश्मीर बनत आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे खूपच मजबूत असे राज्य आहे. राज्य चालवणारे जरी चुका करु लागले तरीही राज्याची जनता ही अत्यंत मजबूत आणि सक्षम आहे. महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य असल्याकारणाने महाराष्ट्रावर  काश्मीर बनण्याची वेळ येणार नाही. 

शुक्रवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका 62 वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी मदन शर्मा यांना यासाठी मारहाण केली आहे की त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर बनलेलं एक व्यंगचित्र सोशल मिडीयात शेअर केलं होतं. 

हे वाचा - आनंदाची बातमी! ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी पुन्हा सुरू

याप्रकरणी तक्रार करणाऱ्या मदन शर्मा यांनी सांगितलं की, आधी सोशल मिडीयावरुन ते व्यंगचित्र हटवण्यासंबधी त्यांना धमकीचे फोन आले. त्यांनी ते व्यंगचित्र काढून टाकले नसल्याने शुक्रवारी सकाळी ११:३० च्या सुमारास उपनगर कांदिवलीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या भागात शिवसेनेचे काही कार्यकर्ते गेले आणि त्यांनी मदन शर्मा यांना मारहाण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Sponsered Terror Condition In Maharashtra Says Fadanvis