
नवी दिल्ली - लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त म्यानमारमधील मंडाले येथे त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. ब्रिटिशांच्या कैदेत असताना लोकमान्यांनी याच कारागृहात गीतारहस्य ग्रंथ लिहिला होता.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी म्यानमारला दिलेल्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान मंडाले येथे लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्याच्या योजनेवर द्वीपक्षीय चर्चा झाली. हा पुतळा उभारण्याचे काम याच वर्षभरात पूर्ण करण्याची भारत सरकारची योजना आहे. त्याचबरोबर २०१६ मधील भूकंपात मोठे नुकसान झालेल्या बगान मंदिरसमूहाच्या जीर्णोद्धारासाठीही भारत सरकार म्यानमारला आर्थिक मदत देणार आहे.
कोविड-१९ महामारीशी लढण्यासाठी भारताने म्यानमारला ३००० व्हिरल्सची मदत दिली आहे आणि तीही रक्कम यावेळी त्या देशाकडे सुपूर्द करण्यात आली. ब्राम्ही भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचा भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याची योजनाही दोन्ही देशांनी मान्य केली. जनरल नरवणे व श्रींगला यांनी म्यानमारच्या प्रमुख ऑन सान स्यू की व लष्करप्रमुख जनरल आँग हांल्ग यांच्याशीही चर्चा केली.
२२ बंडखोर ताब्यात
दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता राखण्यासाठीच्या सहकार्यावरही चर्चा करण्यात आली. त्यानुसार म्यानमारने पकडलेल्या २२ भारतीय बंडखोरांना भारताच्या ताब्यात दिले. केंद्र सरकारने नागालॅंडमधील एनएससीएन (खापलांग) बंडखोर गटावरील बंदी , हिंसक व बेकायदा कारवायांच्या कारणावरून वाढविली होती. त्यानंतर काही दिवसांतच दोन्ही देशांदरम्यान सामरिक, व्यापार व सांस्कृतिक संबंध सुरळीत करण्याची पावले टाकण्यात आली.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.