esakal | चीननंतर बिपीन रावत यांनी दिला पाकला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

bipin rawat

उत्तरेच्या सीमारेषेभागातील परिस्थितीचा फायदा घेण्याच्या इराद्याने पाकने काही कुरापती केल्या तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. त्यासाठी लष्कर सज्ज आहे, असे बिपीन रावत यांनी म्हटले आहे.

चीननंतर बिपीन रावत यांनी दिला पाकला इशारा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय. सीमारेषेवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकने काही हालचाली केल्या तर त्यांची खैर केली जाणार नाही, असे ते म्हणाले आहेत. उत्तरेच्या सीमारेषेभागातील परिस्थितीचा फायदा घेण्याच्या इराद्याने पाकने काही कुरापती केल्या तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. त्यासाठी लष्कर सज्ज आहे, असे बिपीन रावत यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सीमारेषेवर तैनात असलेल्या एअरक्राफ्टमधील कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.    

सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने भारताबरोबरील चर्चा गांभीर्याने करावी

आम्ही सीमारेषेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या विचाराचे आहोत. मागील काही दिवसांत चीनकडून कुरापती सुरु आहेत. ही परिस्थिती हाताळण्यासाठी भारत सक्षम आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे जवान सीमारेषेवरील संकट परतवून लावण्यात सक्षम आहे, असेही बिपीन रावत यावेळी म्हणाले आहेत.  यापूर्वी बिपीन रावत यांनी चीनलाही असाच सजड दम भरला होता. 

जगाचाही आमच्यावर विश्‍वास, लोकशाही मूल्यांना आम्ही बांधील - पंतप्रधान मोदी

भारत-चीन यांच्यातील तनावाच्या पार्श्वभूमीवर रावत म्हणाले होते की, चीनला चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढयचा नसेल तर भारताकडे सैन्याचा पर्याय खुला आहे. सध्याच्या घडीला शांतीच्या मार्गाने योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी जवान बारिक लक्ष्य ठेवून आहेत. सरकार चर्चेतून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक असून जर चीनकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर युद्धासाठीही तयार आहोत, असा इशारा बिपीन रावत यांनी चीनलाही दिला होता.