esakal | Big Breaking : भारतीय किनारपट्टीला धडकले महाचक्रीवादळ 'अम्फान'; बंगाल आणि ओडिसातील लाखोंचे स्थलांतर!
sakal

बोलून बातमी शोधा

Amphan-Cyclone

सध्या बंगाल आणि ओडिसामधील नागरिकांपुढे कोरोना व्हायरस आणि अम्फान अशा नैसर्गिक आपत्तीचे दुहेरी संकट उभे राहिले आहे.

Big Breaking : भारतीय किनारपट्टीला धडकले महाचक्रीवादळ 'अम्फान'; बंगाल आणि ओडिसातील लाखोंचे स्थलांतर!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी दोन हात करत असलेल्या भारतापुढे आता अम्फान चक्रीवादळाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांना अम्फानने आल्याआल्याच तडाखा दिला आहे. तसेच शेजारील राष्ट्र असलेल्या बांगलादेशलाही नुकसान पोहोचवले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये दुपारी २.३० वाजल्यापासून जोरदार वारे वाहत आहे. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिल्याने या दोन्ही राज्यांतील ११ लाखाहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)ने दिली. दुसरीकडे बांगलादेशमधील सुमारे २० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 

- मोठं संकट; पश्चिम बंगाल, ओडिशाकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द

पुढील १२ तासांमध्ये अम्फान चक्रीवादळ आणखी उग्र रूप धारण करेल. यावेळी त्याचा वेग १५५ ते १६५ किमी प्रति तास एवढा असेल. तर चक्रीवादळाने उग्र रुप धारण केल्यानंतर त्याचा वेग १८५ किमी प्रति तास पर्यंत वाढेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

- प्रियांका गांधी म्हणाल्या, आमच्या 'त्या' वाहनांवर भाजपचे झेंडे लावा; पण...

दरम्यान, अम्फानमुळे बंगालच्या काही भागात जोरदार पाऊस झाला असून वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. सध्या बंगाल आणि ओडिसामधील नागरिकांपुढे कोरोना व्हायरस आणि अम्फान अशा नैसर्गिक आपत्तीचे दुहेरी संकट उभे राहिले आहे. या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची चाळीस पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती एनडीआरएफचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी दिली.

ठाकरेंनी महाआघाडी तोडावी अन्यथा...; भाजप नेत्याने दिला इशारा

loading image
go to top