कौतुकास्पद! विहिरीत पडलेल्या नागाला वाचवण्यासाठी तरुणांची धडपड; VIDEO VIRAL

पीटीआय
Tuesday, 16 February 2021

एका विहिरीत पडलेल्या नागाला वाचवण्यासाठी काही तरुणांनी मिळून केलेल्या प्रयत्नांची सध्या सोशल मीडियात चर्चा आहे. बुडणाऱ्या मुक्या जीवाला वाचवण्यासाठी या तरुणांनी थेट विहिरत उड्या घेत त्याचे प्राण वाचवले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - एका विहिरीत पडलेल्या नागाला वाचवण्यासाठी काही तरुणांनी मिळून केलेल्या प्रयत्नांची सध्या सोशल मीडियात चर्चा आहे. बुडणाऱ्या मुक्या जीवाला वाचवण्यासाठी या तरुणांनी थेट विहिरत उड्या घेत त्याचे प्राण वाचवले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

रॉजर स्नाइप्स नावाच्या एका युजरने सर्वप्रथम हा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यानंतर तो वेगाने व्हायरल झाला. चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये काही तरुण मुलं नागाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना शेवटी ते त्याला वाचवण्यात यशस्वीही होतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चुकून पाण्यानं भरलेल्या विहिरी पडल्यानंतर बाहेर येण्याचा मार्ग सापडत नसल्याने नागाची मोठी धडपड सुरु होती. त्याचवेळी या विहिरीजवळ असलेल्या काही तरुणांनी या नागाची कीव आली आणि त्यांनी त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. या तरुणांपैकी एकानं थेट विहिरीत उडी घेतली आणि नागाला ठराविक ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. तर इतर तरुणही एक एक करुन त्या नागाला वाचवण्यासाठी विहिरीत उतरले. यावेळी एकाच्या हातात साप पकडण्याचा स्टीलचा रॉड होता. अनेक प्रयत्नांनंतर या रॉडच्या मदतीने या नागाला विहिरीबाहेर काढण्यात त्यांना यश आले. विहिरीबाहेर काढल्यानंतर नागाला एका पारदर्शी प्लॅस्टिकच्या बाटलीत बंद करुन नंतर जंगलात सोडून देण्यात आलं. 

'टूलकिट डिलिट कर नाहीतर...' दिशाचा ग्रेटाला मेसेज; चॅट व्हायरल

हा व्हायरल झालेला व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. यांपैकी एका युजरनं म्हटलं की, "अशा प्रकारे एखाद्या सापाला पाण्यात बुडताना पाहून अनेकांनी त्याला बुडू दिलं असतं पण या तरुणांनी आपल्यातील दयाळूपणाचे दर्शन घडवत घडवलं", "स्वतःचा जीव धोक्यात घालून नागाचा जीव वाचवणाऱ्या या तरुणांना सलाम," असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे.

राज्यपाल किरण बेदींविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस सरकार अल्पमतात, आणखी 2 आमदारांचे राजीनामे

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: struggle youth to save the cobra that fell well