'टूलकिट डिलिट कर नाहीतर...' दिशाचा ग्रेटाला मेसेज; चॅट व्हायरल

greta thunberg disha ravi
greta thunberg disha ravi

नवी दिल्ली - टूलकिट प्रकरणात दिशा रवीला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिस आता इतर लोकांचा शोध घेत आहेत जे याच्या प्लॅनिंगमध्ये सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, व्हॉटसअॅप चॅट समोर आलं असून यामध्ये तीन फेब्रुवारीच्या रात्री स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि दिशा रवी यांच्यात चर्चा झाली होती. चॅटमधून असं समोर आलं आहे की, ग्रेटाने चुकून टूलकिट ट्विट केल्यानं दिशा घाबरली होती. दिशाला यामुळे युएपीएची भीती वाटत होती.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दिशा रवीला अटक केली आहे. सध्या तिची चौकशी केली जात आहे. दिशाचा मोबाइल डेटाही रिकव्हर करण्यात आला असून ग्रेटा थनबर्ग आणि दिशा रवी यांच्यातील चॅटसुद्धा समोर आलं आहे. ग्रेटा थनबर्गने जेव्हा टूलकिट सोशल मीडियावर शेअर केलं होतं तेव्हाचं हे चॅट असल्याचं आजतकने म्हटलं आहे. 

ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट तीन फेब्रुवारीला अपलोड केलं होतं. ते नंतर डिलिट करण्यात आलं. त्याच रात्री दोघींमध्ये चॅट झालं होतं. रात्री 9 वाजून 23 मिनिटांनी दिशाने मेसेज करून ग्रेटाला चूक झाल्याचं सांगितलं होतं. यानंतर ग्रेटाने दिशाला मेसेज केला होता. दिशाने केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं होतं की, तू पूर्ण टूलकिट ट्विट नाही केलंस तर चालेल का? आपण थोडावेळ थांबू शकतो का? मी वकिलांसोबत बोलणार आहे. त्यावर आपली नावे असल्यानं आमच्याविरोधात युएपीए अंतर्गत कारवाई होऊ शकते.

दिल्ली पोलिसांनी दिशाच्या अटकेसह तिच्याकडचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससुद्धा जप्त केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, दिशाने खूप डेटा डिलिट केला असून तो रिकव्हर केला जात आहे. आता तिच्या मोबाइलसह इतर डिव्हाइसेसमध्ये शोध घेतला जात आहे. डिलिट करण्यात आलेला सर्व कंटेंट काढला जात आहे. यातूनच चॅट समोर आलं असून धक्कादायक खुलासा झाला आहे. 

टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दावा केला आहे की, दिशा रवी ज्या टूलकिटमध्ये सहभागी होती त्यामध्ये प्लॅन तयार करण्यात आला होता. यानुसार दिल्लीत 26 जानेवारीला हिंसा करण्याचा प्लॅन होता. दिल्ली पोलिसांनी खलिस्तानी समर्थक एका संघटनेतील व्यक्तीचा यामध्ये हात असल्याचा दावाही केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com