दहावीच्या विद्यार्थ्याने या कारणास्तव उचललं टोकाचं पाऊल; धावत्या ट्रेनसमोर मारली उडी अन्...

हमीरपूर येथील रहिवासी विद्यार्थ्यांने रेल्वेसमोर उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. या विद्यार्थ्याने यंदा दहावीची परीक्षा दिली होती आणि तो परिक्षेत नापास झाल्यामुळे तो निराश असल्याचे समोर आले आहे.
crime news
crime newsEsakal

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात दहावीच्या परिक्षेत नापास झाल्याने एका विद्यार्थ्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांदा जिल्ह्यातील जसपुरा गावात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर शहरातील कानपूर-बांदा रेल्वे ट्रॅकवर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. जसपुरा येथील रहिवासी नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, त्यांचा १७ वर्षांचा मुलगा शिवाजी हा गावातील शाळेतील मधुसूदन दास इंटर कॉलेजमध्ये दहावीत शिकत होता.

crime news
Crime News: धक्कादायक! आधी सामूहिक बलात्कार, नंतर कापली जीभ.. मालकिणीचे नोकराणीवर अमानुष अत्याचार

निकाल आल्यानंतर विद्यार्थ्याची निराशा झाली

यावर्षी या विद्यार्थ्याने १० वीची परीक्षा दिली होती. शनिवारी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा तो नापास झाल्याचे त्याला समजले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर पडला.

कुटुंबीयांनी गावात त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. विद्यार्थ्याने शहरात येऊन रात्री ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. सकाळी, रेल्वे कर्मचारी ट्रॅक तपासणीसाठी कल्लू येथे जात असताना, त्यांना शहरातील रेल्वे स्थानकापासून दोन किमी अंतरावर यमुना साऊथ बँकेच्या दिशेला विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला.

crime news
Pune Crime News: हडपसर परिसरात व्यावसाईक वादातून दिवसाढवळ्या गोळीबार, घटनेने खळबळ

रेल्वे कर्मचाऱ्याने स्टेशन मॅनेजरला ही माहिती दिली. त्यांनी संबधीत माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या वडिलांना त्याच्या मृत्यूची माहिती दिली. मृतदेह पाहून घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते.

यूपी बोर्डाने 10वी-12वीचा निकाल केला जाहीर

यूपी बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. 10 वी मध्ये 89.55% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, ज्यात 93.40% मुली आणि 86.05% मुले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com