गुजरातमधील राजकोट मधून एक धक्कादायक रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. येथील एका खासगी विद्यापीठात एका 19 वर्षीय विद्यार्थ्याचा आंघोळ करतानाचा नग्न व्हिडिओ बनवला. त्यानंतर पाच जणांनी पीडित विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.
विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर आणि मध टाकला. एवढेच नाही तर त्यानंतर त्यांनी टूथब्रश आणि पेन्सिलही घातली. याशिवाय विद्यार्थ्याला त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकण्याची धमकीही देण्यात आली होती. पाच आरोपींपैकी एक विद्यार्थी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी पाचपैकी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन असून त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 20 ऑक्टोबर रोजी, मुलाने कुटुंबाला त्याच्या सोबात घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडिताच्या वडिलांनी कुवाडवा रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.