जेएनयू बंद करण्याचा 'या' भाजपनेत्याने दिल्ला सल्ला

Subramanian Swamy demands closing of JNU
Subramanian Swamy demands closing of JNU

अहमदाबाद : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) बंद करण्यात यावे, असा सल्ला भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सरकारला दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अहमदाबाद येथील एका खासगी विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी स्वामी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""सरकारने जेएनयूबाबत मोठे पाऊल उचलले पाहिजे. त्याच्या स्वच्छतेसाठी किमान दोन वर्षे तरी हे विद्यापीठ बंद केले पाहिजे. त्यानंतर जेव्हा हे विद्यापीठ सुरू होईल, त्या वेळी त्याचे नामकरण सुभाषचंद्र बोस विद्यापीठ असे करावे.''

मंत्री होऊन गोव्याला गेला अन् एका मसाजने...

"विद्यापीठ बंद करण्यापूर्वी चांगल्या विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात किंवा इतर ठिकाणी प्रवेश दिले गेले पाहिजेत आणि जे हुल्लडबाज आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे,'' असे मतही त्यांनी व्यक्त केले.

JNU Attack : स्मृती इराणींचे दीपिकाला थेट आव्हान; म्हणाल्या...

स्वामी म्हणाले, ""नेहरूंच्या नावाने आधीच अनेक संस्था आहेत. त्यामुळे जेएनयूचे नाव बदलले पाहिजे. जेएनयू तथा इतर ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेबाबतच्या हिंसक विरोधामागे दहशतवादी आणि विदेशी तत्त्वांचाही हात आहे.''

जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

दरम्यान, जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी जेएनयूच्या प्राध्यापकांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यात जेएनयूतील हिंसाचाराशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, डेटा आणि पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com