धक्कादायक : मुशर्रफ यांना भारतीय नागरिकत्व देण्याची भाजप नेत्याचीच मागणी

टीम ई-सकाळ
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा तेथे ज्या पद्धतीने छळ केला जात आहे, हे पाहता आपण त्यांना तातडीने भारतीय नागरिकत्व देऊ शकतो : सुब्रमण्यम स्वामी

इस्लामाबाद : भारतात नागरिकत्व कायद्याविरोधात संपूर्ण देशात वातावरण तापलेले असतानाच भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी परवेझ मुशर्रफ यांनी भारतीय नागरिकत्व देण्यात यावे, असे खळबळजनक विधान आज केले. स्वामी यांनी याबाबत ट्विट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा तेथे ज्या पद्धतीने छळ केला जात आहे, हे पाहता आपण त्यांना तातडीने भारतीय नागरिकत्व देऊ शकतो. याचे कारण म्हणजे मुशर्रफ हे पूर्वी दरियागंजमध्ये राहत होते आणि सध्या पाकिस्तानमध्ये त्यांची छळवणूक सुरु आहे. स्वतःला हिंदूचा वंशज मानणाऱ्या सर्व व्यक्तिंना नव्या नागरिकत्व कायद्यानुसार त्यांना भारतीय नागरिकत्व दिले पाहिजे. 

आणखी वाचा - दिल्ली ठप्प; मेट्रोसेवेवरही परिणाम

मुशर्रफ यांचा गांभीर आरोप
दरम्यान, पाकिस्तानी न्यायालयाने देशद्रोहाबद्‌दल सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा ही वैयक्तिक सूडभावनेने दिली आहे, असा आरोप पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख, अध्यक्ष आणि हुकूमशहा परवेझ मुर्शरफ यांनी बुधवारी (ता.18) केला. शिक्षेच्या सुनावणीनंतर मुशर्रफ यांनी काल प्रथमच प्रतिक्रिया दिली. मुशर्रफ यांना न्यायालयाने मंगळवारी (ता.17) देशद्रोहाबद्दल मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या निर्णयाला पाकिस्तानी सैन्याने विरोध दर्शविला आहे. आहेत. निकालानंतर मुशर्रफ समर्थकांनी देशाच्या विविध भागात छोटे मोर्चे काढले होते. मुशर्रफ यांच्या पक्षातर्फे प्रसारित केलेल्या व्हिडिओत त्यांनी न्यायालयाचा निकाल सूडबुद्धिने घेतला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मुशर्रफ यांना शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळायची यावर पंतप्रधान इम्रान खान यांनी आज सकाळी त्यांच्या सल्लागारांशी चर्चा केली. पाकिस्तान आणि संयुक्त अबर अमिरातीमध्ये प्रत्यार्पण करार झालेला नाही आणि अमिरातीमधील अधिकारी त्यांना अटक करण्याची शक्‍यता कमी आहे. 

न्यायालयाच्या या निकालावर अनेक प्रश्‍नचिन्ह आहेत आणि त्यात कायद्याचे पालन केलेले नाही. या प्रकरणात घटनेनुसार सुनावणी घेण्याची काही आवश्‍यकता नव्हती, मात्र तरीही सुनावणी घेण्यात आली कारण काही लोकांच्या मनात माझ्याबद्दल सूडाची भावना आहे आणि एका व्यक्तीने मला यात फशी पाडले आहे.
-परवेझ मुशर्रफ, माजी राष्ट्रप्रमुख, पाकिस्तान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: subramanian swamy statement on pervez musharraf indian citizenship