esakal | देशाचा जीडीपी वेगाने वाढतोय; सुब्रमण्यम स्वामींचा PM मोदींंना घरचा आहेर
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे सातत्यानं मोदी सरकारवर टीका करतात. यावेळीही त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.  

देशाचा जीडीपी वेगाने वाढतोय; सुब्रमण्यम स्वामींचा PM मोदींंना घरचा आहेर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे सातत्यानं मोदी सरकारवर टीका करतात. यावेळीही त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली आहे. काश्मीर, पाकिस्तान, जीडीपी, कोरोना लस यावरून त्यांनी ट्विट केलं आहे. पाकसोबत व्यापारी संबंधांची चर्चा सुरु असल्यावरून स्वामी यांनी लिहिलं की, काश्मीर प्रश्नावर मोदी सरकारने पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली आहे. पुढच्या काही दिवसात मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लंडनमध्ये डिनर करताना दिसतील असा खोचक टोलाही लगावला आहे. 

सुब्रमण्यम स्वामी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यातच त्यांनी बुधवारी सकाळी पाकसोबत व्यापाराच्या शक्यतेची बातमी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मीरप्रश्नी शरणागती, गुड बाय POK, मला विश्वास आहे लवकरच मोदी आणि इम्रान खान लंडनमध्ये डिनर करतील असं म्हटलं. 

याशिवाय सुब्रमण्यम स्वामी यांनी एस्ट्राझेनकाच्या लशीवर कॅनडा, जर्मनीने बंधनं घातली आहेत. यावरूनही खोचक टीका केली आहे. इतर देश खोटं बोलतायत का? असा सवाल विचारताना त्यांनी म्हटलं की, एस्ट्राझेनका देवानं आपल्यासाठी पाठवली आहे. इतर देश लस सस्पेंड करत आहेत, त्यांचा बुद्ध्यांक कमी आहे. आमच्या देवदूताला सगळं माहिती आहे त्याच्यावर सोडा सर्व असंही स्वामींनी म्हटलं आहे. 

हे वाचा - ममतांचा नंदीग्राममध्ये पराभव? प्रशांत किशोर यांच्या लीक सर्व्हेमुळे खळबळ

आपल्या अधिकाऱ्यांना काय झालंय? असा प्रश्न विचारताना स्वामींनी म्हटलं की, चीनने भारताची एक इंचभर जमीनीही बळकावलेली नाही. जीडीपी वाढत आहे. पाकिस्तान आपला भाऊ आहे. बांगलादेश आपलं कुटुंब असं म्हणत सुब्रमण्यम स्वामींनी खोचक टीका केली आहे. 

भाजप हिंसाचार खपवून घेणार नाही; पंतप्रधान मोदी​

जगातील काही देशांमध्ये एस्ट्राझेनकाच्या लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर युरोपात अनेक देशांनी लस देणं थांबवलं होतं. याबाबत युरोपीय मेडिकल एजन्सीने असा काही प्रकार झाला नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यानंतर पुन्हा लसीकरण सुरळीत सुरु झाले. 
 

loading image