
Indian Astronaut First Message: भारतासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या Axiom-4 अंतराळ मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा पार करत, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे अंतराळात यशस्वी आगमन झाले आहे. २५ जून २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेप घेतली. या मोहिमेत त्यांच्या सोबत अमेरिका, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीरही सहभागी आहेत.