मुनगंटीवार, वाघ यांना बढती

टीम नड्डा -२ मध्ये शेलारांचाही समावेश; नारायण राणेंचे नाव वगळले
Sudhir-Mungantiwar
Sudhir-Mungantiwarsakal

नवी दिल्ली, ता. ७ : भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर केली. नव्या पक्षनेत्यांना ‘टीम नड्डा‘ मध्ये काम करण्याची संधी देण्यावर भाजपच्या नेतृत्वाचा भर असल्याचे यादीवरून दिसते.

३०९ जणांच्या या टीम नड्डा-२ मध्ये राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा (मुंबई) तसेच विनोद तावडे, पंकजा मुंडे, डॉ. हीना गावित यांच्याबरोबरच प्रकाश जावडेकर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे आदी महाराष्ट्रातील नेत्यांची नावे यादीत आहेत. आशिष शेलार, चित्रा वाघ व सुधीर मनुगंटीवार यांना विशेष आमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नव्या कार्यकारिणीत स्थानही दिले नाही.

Sudhir-Mungantiwar
नोटाबंदी, कलम ३७० रद्द करुनही दहशतवाद थांबलेला नाही - राहुल गांधी

या कार्यकारिणीत ८० सदस्य, ५० विशेष आमंत्रित व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आदी १७९ कायमस्वरूपी आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशिवाय ‘टीम मोदी’मधील निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, खासदार स्मृती इराणी, जितेंद्र सिंह, एस. जयशंकर, भूपेंद्र यादव, गिरीराज सिंह, नरेंद्र तोमर आदी बहुतेक मंत्र्यांची वर्णी लागलेली आहे. योगी आदित्यनाथ व शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपचे सध्याचे १२ मुख्यमंत्री व ८ उपमुख्यमंत्रीही कार्यकारिणीत आहेत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, बी एस येडियुरप्पा यांची नावे कायम ठेवली. विनय कटियार यांचा पत्ता कट झाला आहे.

या टीममध्ये उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल आदी राज्यांचे अस्तित्व जाणवते. अनेक विभाग असे आहेत की ज्यात मराठी नावे नाहीतच. २६ राष्ट्रीय प्रवक्त्यांमध्ये शहानवाज हुसेन व संजय मयूख, कॉंग्रेसमधून आलेले टॉम वढक्कन आदींची नावे आहेत. यात राज्यातून केवळ हीना गावित या एकट्याच आहेत.

महाराष्ट्रातील सदस्य

नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुध्दे, चित्रा वाघ (कार्यकारिणी सदस्य), देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर (विधिमंडळ पक्षनेते) चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष), विनोद तावडे, सुनील देवधर (राष्ट्रीय मंत्री), सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, लड्डाराम नागवाणी (विशेष आमंत्रित), हीना गावित (प्रवक्त्या), जमाल सिद्दिकी (अल्पसंख्यांक आघाडी), सी टी रवी, जयभानसिंग पवैय्या व ओमप्रकाश धुर्वे (प्रभारी, सहप्रभारी)

विजया रहाटकरांबाबत नजरचूक?

भाजप महिला आघाडीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांचेही नाव अधिकृत यादीत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नड्डा यांनी रहाटकर यांच्याशी चर्चा केली व त्यांचे कार्यकारिणीतील स्थान अबाधित असल्याची ग्वाही दिली. अधिकृत यादीत ‘नजरचुकीने‘ रहाटकर यांचा नामोल्लेख राहिल्याचे सांगण्यात आले. राणे यांचा कार्यकारिणीत समावेश नाही. ते भाजपमध्ये नवीन म्हणून त्यांचे नाव नाही म्हणावे तर ज्योतिरादित्य सिंदे, अश्विनी वैष्णव, मिथून चक्रवर्ती, दिनेश त्रिवेदी यासारख्या भाजपवासी झालेल्या अनेकांना यादीत स्थान मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com