आणखी तीन महिन्यांसाठी साखर निर्यातीस मुदतवाढ

sugar
sugar
Updated on

नवी दिल्ली - सरकारने साखर निर्यातीस अतिरिक्त तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. अन्न मंत्रालयाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार कारखान्यांना निर्यातीचे करार पूर्ण करण्यासाठी साठ लाख टन साखर साठा डिसेंबरपर्यंत निर्यातीची मुभा मिळाली आहे. 

कोरोना संकट काळातील लाॅकडाऊनमुळे निर्यात थांबल्याने कारखान्यांची अडचण वाढली असून अतिरिक्त साखर साठ्याची समस्याही निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येणाऱ्या 2019-20 या वर्षाच्या गळीत हंगामासाठी सरकारने 60 लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. इराण, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांना साखरसाठा निर्यात होणे अपेक्षित आहे. 

अन्न मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुबोध कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार साठ लाख टन साखर साठ्यापैकी 57 लाख टन साठ्याचे करार झाले असून 56 लाख टन साखर कारखान्यातून बाहेर काढली जात आहे. लाॅकडाऊनमुळे बऱ्याच कारखान्यांना साखर साठा बाहेर काढता आला नसल्यामुळे निर्यात शक्य झाली नव्हती. साहजिकच ही अडचण दूर करण्यासाठी डिसेंबरपर्यंत कारखान्यांना साखर साठा निर्यात करण्यास परवानगी दिली असल्याचेही सुबोधकुमार सिंह यांनी सांगितले. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या साखर निर्यातीसाठी सरकारकडून 6269 कोटी रुपये अंशदान दिले जात असून यामुळे कारखान्यांकडील अतिरिक्त साखर साठ्याचा प्रश्न निकाली निघून ऊसउत्पादकांनाही थकबाकी मिळू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com