

Belgaum Erupts! Swabhimani Farmers Unite for Fair Sugarcane Rate of ₹3,751
esakal
बेळगाव : कोल्हापूर व सांगली जिल्ह्याबरोबरच कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३७५१ रुपयांची पहिली उचल मिळवून देण्यासाठी आंदोलनाची तीव्रता अधिक वाढविण्याची आर्त हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर येथे झालेल्या ऊस उत्पादकांच्या आंदोलनादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले.