बिहारनंतर भाजपचे 'मिशन बंगाल'; ममतांना शह देण्यासाठी दोन मराठी शिलेदार

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 18 November 2020

बिहारमधील विधानसभा विजयानंतर भाजपाने आता पश्चिम बंगालवर लक्ष घातलं आहे.

नवी दिल्ली: बिहारमधील विधानसभा विजयानंतर भाजपाने आता पश्चिम बंगालवर लक्ष घातलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा दबदबा मोठा आहे. त्यामुळे आता तिथं तृणमुल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपाने मिशन बंगालची सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूका 2021च्या एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पाच भागात केंद्रीय नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

पाच नेत्यांची प्रभारीपदी नियुक्ती-
सुत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये सत्ता काबीज करण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच प्रभारी नियुक्तीनंतर आता ते पुढील महिन्यात राज्याचा दौराही करण्याची शक्यता आहे. राज्याच्या प्रभारीपदी नियुक्त झालेल्या नेत्यांमध्ये सुनील देवधर, विनोद तावडे, दुष्यंत गौतम, हरीश द्विवेदी आणि विनोद सोनकर यांचा समावेश आहे.

Corona Updates: सावधान! संसर्ग पुन्हा वाढला; 24 तासांत 38 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

त्रिपुराच्या विजयात सुनिल देवधरांची महत्वाची भूमिका-
पश्चिम बंगालच्या पाच भागात हे नेते पक्षाचे प्रभारी म्हणून काम करणार आहेत. उत्तर बंगाल, राढ बंग (दक्षिण-पश्चिम जिल्हे), नवद्वीप, मेदिनीपुर, आणि कोलकत्ता या पाच भागांत भाजपाने प्रभारी नियुक्त केले आहेत. दोन वर्षांपुर्वी त्रिपुरामध्ये विजय मिळवण्यामध्ये सुनील देवधरांची महत्वाची भूमिका होती. पश्चिम बंगालमध्ये त्यांना मोदिनीपुर या विभागाचे प्रभारी म्हणुन नियुक्त केलं आहे.

हेही वाचा - निष्क्रीय राहून बोलणं म्हणजे आत्मपरिक्षण नसतं; अधिर रंजन चौधरींची कपिल सिब्बल यांच्यावर टीका

उच्चस्तरीय बैठकीनंतर निर्णय जाहीर-
कलकत्त्यामध्ये झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर भाजपाचे राष्ट्रीय संघटन महासचिव बी. एल. संतोष आणि राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी या निर्णायाची घोषणा केली. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषही उपस्थित होते. बैठकीनंतर घोष यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, नियुक्त केलेले पाच नेते त्यांच्या क्षेत्रात पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil devdhar and vinod tawade will be in west bengal for assembly election 2021