
अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे स्वत:च्याच समाजातील लोकांकडून टीकेचा धनी व्हावं लागलं असं विधान भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांनी केलं. शनिवारी गोवा हायकोर्ट बार असोसिएशनकडून आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरन्यायाधीश बीआर गवई म्हणाले की, माझ्याच जातीचे लोक माझ्याविरोधात उभा राहिले. माझ्या निर्णयावरच माझ्या समाजातील लोकांनी टीका केली. पण मला वाटतं की, माझा निर्णय जनतेच्या अपेक्षेनुसार नाही तर कायद्याची समज आणि अंतरात्म्याच्या आवाजानुसार असतो.