'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Supreme Court on NTA: नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणामुळे राष्ट्रीय चाचणी संस्थेवर टीका झाली. गेल्या वर्षी समोर आलेल्या पेपरफुटीच्या वादातून संस्थेने कोणताही धडा शिकलेला नाही ही खेदाची बाब आहे, असे न्यायालयाने म्हटले.
NEET UG 2026

NEET UG 2026

ESakal

Updated on: 

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२५ मे) नीट-यूजी २०२६ परीक्षेसंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी घेतली. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन्स (FAIMA) आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंट यांनी दाखल केलेल्या याचिकेला प्रतिसाद देताना न्यायालयाने केंद्र सरकार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि सीबीआय यांना त्यांचे उत्तर मागण्यासाठी नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी शुक्रवारी (२९ मे) होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com