

sanitary pads in schools mandate
ESakal
शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये आणि सॅनिटरी पॅडबाबत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये महिला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालये आणि सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. सर्व सरकारांना तीन महिन्यांत त्याचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांमध्ये मासिक पाळीच्या काळात मुलींना येणाऱ्या समस्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आधारित हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला.