
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घेत केंद्र सरकारने सोशल डिस्टन्सिंगची सक्ती केली आहे. दरम्यान देशव्यापी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने काही गोष्टींमध्ये सूट दिल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात पूर्णत: बंद असलेल्या मद्य विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानंतर देशभरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची आतापर्यंतची सर्व मेहनत वाया जाण्याचे भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. मद्य खरेदीसाठी तळीराम करत असलेल्या गर्दीवर नियंत्रण घालण्यासाठी मद्य विक्रीसाठी दुकाने खुली न करता घरपोच मद्य विक्री करण्याचे आदेश द्यावे, असे या याचिकेत म्हटले होते.
मद्य विक्रीसाठी घरपोच सेवा द्यावी हा आदेश देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे. मात्र गर्दी नियंत्रित करण्यासाठी मद्य विक्रीची घरपोच सेवा हा उत्तम पर्याय ठरु शकतो. त्यामुळे सरकारने यावर विचार करायला हवा, असे सर्वोच्च न्यायालयाने तोंडी स्वरुपात सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दिल्लीसह देशातील विविध भागात मद्य विक्रीला मूभा देण्यात आली आहे. हा निर्णय झाल्यापासून मद्य विक्रीच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात हा प्रकार दिसत असून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला घरपोच मद्य विक्रीची व्यवस्था करा, असे आदेश द्यावे, असा उल्लेखही याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेकर्त्याची सूचना योग्य असल्याचे मान्य केले. मात्र यासंदर्भात कोणताही आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट करत सरकारने याबाबत विचार करावा, असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.