Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती.
केजरीवाल
केजरीवालgoogle

नवी दिल्ली ः सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) झालेल्या अटकेला आव्हान देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती.

केजरीवाल
Pune News : पानशेत नदीपात्रात गोधड्या धुण्यासाठी गेलेल्या पुण्यातील मजूर तरुणाचा बुडून मृत्यू

‘ईडी’कडून झालेली अटक बेकायदा असून हा संघराज्य व्यवस्थेवरील हल्ला असल्याचा केजरीवाल यांचा दावा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपणास जाणूनबुजून अटक करण्यात आली असून अटकेमुळे हवाला प्रतिबंधक (पीएमएलए) कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचा युक्तिवाद केजरीवाल यांनी याचिकेत केला आहे. न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

भगवंत मान केजरीवालांना भेटणार

तिहार तुरुंगात बंद असलेल्या केजरीवाल यांची येत्या मंगळवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मान यांनी याआधी एकदा केजरीवाल यांची तुरुंगात भेट घेतली होती. केजरीवाल यांना तुरुंगात आवश्यक त्या सोयी सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप त्यावेळी मान यांनी केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com