

Tetra Pack Liquor Packaging Controversy
ESakal
टेट्रा पॅक आणि सॅशेमधील दारूच्या विक्रीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, टेट्रा पॅकवर स्पष्ट आरोग्य सूचना नसतात आणि पॅकेजिंगवर फळांची चित्रे लावून त्याची ज्यूस म्हणून विक्री केली जात आहे. दारूच्या बाटलीकरणासंबंधीच्या नियमांमधील संदिग्धतेमुळे हे घडत आहे.