
SC Sets Aside Bombay HC Decision Favouring Son
Esakal
वडिलांची संपत्ती परत करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने ८० वर्षीय वृद्धाच्या मुलाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ८० वर्षीय वृद्धाला दिलासा देत मुलाला वडिलांची संपत्ती रिकामी करण्यास सांगितलंय. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. मुलाला कनिष्ठ न्यायालयाने वडिलांची मालमत्ता परत करण्याचे आदेश दिल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला होता. हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं.