काहीही कारण सांगू नका! मतमोजणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग न देणाऱ्या निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने झापलं

Supreme Court: निवडणूक आयोगाला स्वतःच्या निवडणुकीचा रेकॉर्ड कसा काय सापडत नाही, असा सवाल कोर्टाने केला. तसंच पुढील सुनावणीपर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
Election Commission of India

Supreme Court

esakal

Updated on: 

Election Commission of India: मतमोजणीचं व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्धन नसल्याचं सांगणाऱ्या निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलंय. निवडणूक घेणाऱ्या संस्थेकडंच त्याच्याशी संबंधित रेकॉर्ड उपलब्ध नसणं हे मान्य करण्यासारखं नाहीय. पुढच्या सुनावणीपर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध करून द्या अन्यथा तुमच्याविरोधात कायदेशीर निष्कर्ष काढला जाईल असं स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयानं बजावलं. कर्नाटकातील शृंगेरी विधानसभा मतदारसंघाच्या २०२३ मधील मतमोजणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com