
SC Vs Governor: तामिळनाडूचे राज्यपाल टीएन रवी आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यामधील मतभेद नेहमीच चव्हाट्यावर येत असतात. हे राज्यपाल कायमच विधानसभेनं मंजूर केलेली विधेयकं अडवून ठेवतात. त्यांच्या मंजुरीवर अंतिम शिक्कामोर्तब करत नाहीत. यामुळं संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टानं राज्यपाल टीएन रवी यांच्यासह देशभरातील राज्यपालांची चांगलीच खरडपट्टी काढली.
विधानसभांचा गळा दाबू नका, तुमच्याकडं विधेयकं अडवण्याची कुठलीही विशेष पावर नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं त्यांना झापलं आहे. तसंच या राज्यपालांना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका प्रसिद्ध विधानाची आठवणही करुन दिली.