नेताजींना राष्ट्रपुत्र घोषित करा, याचिकाकर्त्याची मागणी; सुप्रीम कोर्टानं फटकारलं, म्हणाले, इथून जा नाहीतर..

Supreme Court नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रपुत्र घोषित करावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसंच याचिकाकर्त्याला पुन्हा अशी याचिका दाखल केल्यास मोठा दंड ठोठावू असा इशाराही दिला.
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि आझाद हिंद फौजेची स्थापना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रपुत्र घोषित करावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाही फटकारले आहे. फक्त प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या याचिका पुन्हा पुन्हा दाखल केल्या जात असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com