Russian Woman in Cave : परदेशी लोकांना भारत स्वर्गासारखा, 'त्या' रशियन महिलेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असे का म्हटले?

Supreme Court : सुप्रीम कोर्टाने गोव्यात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांबद्दल नाराजी व्यक्त करत भारताला “स्वर्ग” असे म्हटले. इस्रायली नागरिक गोल्डस्टीनने दोन रशियन मुलींना भारतातून हद्दपार होण्यापासून वाचवण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळली.
Supreme Court of India remarks on the Russian woman cave case in Goa, calling India a paradise for foreigners living illegally.

Supreme Court of India remarks on the Russian woman cave case in Goa, calling India a paradise for foreigners living illegally.

esakal

Updated on

Supreme Court

न्यायालयाने त्याची याचिका “प्रसिद्धीसाठी दाखल” असल्याचे म्हटले आणि निरर्थक ठरवली.
रशियन महिला नीना कुटीना आणि तिच्या दोन मुली कर्नाटकातील गुहेत बेकायदेशीरपणे राहताना सापडल्या होत्या.
कर्नाटक उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर 28 सप्टेंबर रोजी त्या तिघींना रशियात परत पाठवण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने गोव्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी भारत हे "स्वर्ग" असल्याचे वर्णन केले आहे. गोव्यात एका रशियन महिलेसोबत राहणाऱ्या एका इस्रायली पुरूषाने आपल्या दोन अल्पवयीन मुलींना भारतातून हद्दपार करण्यापासून रोखण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या याचिका चुकीची असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com