Supreme Court Shiv Sena Case
esakal
Shiv Sena Symbol Case: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज ठाकरे गटाचे वकील पुन्हा एकदा बाजू मांडत आहेत. गेल्या दोन सुनावण्यांमध्ये सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडून कशाप्रकारे पक्षपातीपणा केला जातो, याबाबत युक्तिवाद केला होता. आजच्या सुनावणीत त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्याचा युक्तिवाद करत, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला. केवळ एखाद्या गटाकडे आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून तोच गट मूळ राजकीय पक्ष ठरू शकत नाही, असं कपिल सिब्बल म्हणाले.