

Supreme Court hearing on the Shiv Sena political dispute, with the Uddhav Thackeray faction asked to explain the difference between dissent and defection
esakal
शिवसेनेतील पक्षांतर्गत वादावर सुनावणी करताना काल (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला ‘मतभेद’ आणि ‘पक्षांतर’ यांच्यातील नेमका फरक स्पष्ट करण्यास सांगितले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली होती. ही कृती केवळ मतभेद म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. त्यावर न्यायालयाने दोन्ही संकल्पनांमधील फरक स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.