
Raj Thackeray Case: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलंय. याचिकेवर सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. सुनावणी सुरू होताच सरन्यायाधीश गवई यांनी याचिकाकर्त्यांना वकिलांनी प्रश्न विचारला की, मुंबई उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का? सरन्यायाधीशांच्या एका प्रश्नावरच याचिकाकाकर्त्यांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली.