
सुप्रीम कोर्टाच्या 2 नव्या न्यायाधीशांची नियुक्ती; राष्ट्रपतींची घोषणा
दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केल्यानंतर 48 तासांच्या आत केंद्राने नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या नावाची घोषणा केली असून शिक्कामोर्तब केले आहे.
(Announcement Of Supreme Court Judge)
गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधांशू धुलिया आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जमशेद बी पार्डीवाला यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षांनी अल्पसंख्यांक समुदायातील न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा: महानगरपालिकांच्या निवडणुका वेळेत होऊ लागल्या ते राजीव गांधी यांच्यामुळे
दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने दोन नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. त्यानंतर लगेच केंद्र सरकारने त्यांची शिफारस मान्य करुन त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. CJI NV रमणा यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने सुधांशू धुलिया आणि जमशेद बी पार्डीवाला यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याच्या शिफारशीवर निर्णय घेतला होता.
नवीन नियुक्ती करण्यात आलेले दोन्ही न्यायाधीश सोमवारी आपल्या पदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जमशेद परडीवाला हे साधारण २०२८ मध्ये देशाचे सरन्यायाधीश होणार असल्याचं बोललं जातंय. ते सुप्रीम कोर्टाचे सहावे पारसी न्यायाधीश आहेत. त्यांच्या आधी अल्पसंख्यांक वर्गातून फेब्रुवारी २०१७ मध्ये अब्दुल नजीर यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती.
हेही वाचा: क्युबामध्ये गॅसगळती; हॉटेलमधील स्फोटात 22 जणांचा मृत्यू
नवीन नियुक्ती करण्यात आलेले न्यायमूर्ती धुलिया हे उत्तराखंड उच्च न्यायालयातून पदोन्नती होणारे दुसरे न्यायाधीश असतील. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या कॉलेजियमने गेल्या वर्षी ऑगस्टपासून सर्वानुमते 11 नावांची शिफारस केली होती. त्यापैकी 3 महिलांसह 9 जणांनी 31 ऑगस्ट 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती.
Web Title: Supreme Court Two New Judge Announcement President
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..