High Court: जीन्स-टीशर्ट घालण्यावरुन महिलेचं चारित्र्य ठरवता येत नाही

चरित्र्यावर संशय घेणारे समाजातील काही लोक शहामृग मानसिकतेचे आहेत असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
High court
High court sakal

रायपूर : एका कौटुंबिक घटस्फोटाच्या वादात छत्तीसगढ उच्च न्यायालयाने 14 वर्षांच्या मुलाचा ताबा वडिलांऐवजी आईकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात जीन्स आणि टीशर्ट घालण्यावरुन स्त्रीचे चारित्र्य ठरवले जाऊ शकत नाही असंही या निकालात कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान घटस्फोटात मुलाचा ताबा आपल्याकडे ठेवण्यासाठी हा वाद सुरू होता.

छत्तीसगढ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, चरित्र्यावर संशय घेणारे समाजातील काही लोक खराब मानसिकतेचे आहेत. दरम्यान या प्रकरणात मुलाचा ताबा आईकडे देत न्यायालयाने फक्त भेटण्याचा अधिकार बापाला दिला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती संजय एस अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

High court
क्युबामध्ये गॅसगळती; हॉटेलमधील स्फोटात 22 जणांचा मृत्यू

वडिलांनी पालकत्व कायदा 1890 च्या कलम 25 अंतर्गत मुलाला ताब्यात घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. वडिलांनी कौटुंबिक न्यायालयात दिलेल्या अर्जात आपल्या बायकोची कपडे घालण्याची पद्धत योग्य नसल्याचा युक्तिवाद केला होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पतीने कौटुंबिक न्यायालयात केलेल्या अर्जात केला होता. महिला दारू, गुटखा, सिगारेटचे सेवन करते, आणि तिच्या म्हणण्यानुसार जर मुलाला आईच्या ताब्यात ठेवले तर मुलाच्या मनावर वाईट परिणाम होईल या आधारे कौटुंबिक न्यायालयाने मुलाचा ताबा वडिलांकडे ठेवला होता.

कौटुंबिक न्यायालयाच्या या आदेशाला मुलाच्या आईने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कौटुंबिक न्यायालयाचा आदेश केवळ एका व्यक्तीच्या वक्तव्यावर आधारित असल्याचा युक्तिवाद महिलेच्या वकिलाने केला. वस्तुस्थिती स्थापित करण्यासाठी आणि पत्नीच्या चारित्र्याचा अंदाज लावण्यासाठी रेकॉर्डवर कोणतेही पुरावे नाहीत असा युक्तीवाद महिलेच्या वकिलांनी केला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या साक्षीदारांनी दिलेल्या पुराव्यांचा अभ्यास करून आपला निकाल दिला आहे.

High court
कहरच केला...: बनावट आधार कार्ड दाखवून 99 गुन्हेगारांना जामीन

"जर एखादी महिला आपल्या उदनिर्वाहासाठी नोकरी करत असेल आणि त्यासाठी एखाद्या पुरूषासोबत सार्वजनिक ठिकाणी कारमध्ये फिरत असेल आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट घालत असेल तर तीच्या चारित्र्यावर आपण संशय घेऊ शकत नाहीत." असा निकाल न्यायालयाने दिला आहे. तसेच जेव्हा महिला जीन्स पॅन्ट टी शर्ट घालते त्या स्थितीत चारित्र्याचे आकलन करणे चुकीचे असून अशा चुकीच्या प्रतिमेला महत्त्व दिल्याने महिलांच्या हक्क आणि स्वातंत्र्यावर गदा येईल. बायकोच्या चारित्र्याचा मुलांच्या भविष्यावर विपरित परिणाम होणार असल्याचं सिद्ध करायचं असेल तर पुरावे अजून जास्त सबळ हवेत असं सांगत न्यायालयाने मुलाचा ताबा वडलांकडून आईकडे देण्याचा निकाल दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com