Supreme Courtesakal
देश
नियम पाळायचे नसतील तर भारत सोडा; सर्वोच्च न्यायालयाचा WhatsApp, Metaला इशारा
Supreme Court on Whatsapp Privacy Policy : युजर्सच्या डेटा शेअरिंगबाबत सर्वोच्च न्यायालयाने व्हॉटसअपला थेट इशारा दिला आहे. गोपनियतेच्या धोरणाचे नियम पाळायचे नसतील तर देश सोडा अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं आहे.
डेटा शेअरिंग आणि प्रायव्हसीवरून सर्वोच्च न्यायालयाने मेटा आणि व्हॉटसअपला फटकारलं आहे. डेटा शेअरिंगच्या नावावर कोणत्याही प्रकारे देशाच्या जनतेच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटलं की, जर भारताचे नियम पाळायचे नसतील तर तुम्ही देशातून गेलं पाहिजे. मेटा आणि व्हॉटसअपने कॉम्पटीशन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. मेटा आणि व्हॉटसअपला २१३ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

