

Supriya Sule and Praful Patel discussion on CP merger
ESakal
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात शुक्रवारी दिल्लीमध्ये अर्धा तास खलबते झाल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे या भेटीनंतर पटेल यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतल्याचे समजते.