Crime: सुरतमध्ये अपहरण, मुंबईत संपवलं; पण कुणी? कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात सापडलेल्या ५ वर्षीय मुलाच्या मृतदेहाचं कोडं उलगडलं

Surat 5-year-old boy murder: कुशीनगर एक्सप्रेस ट्रेनच्या शौचालयात सापडलेल्या ५ वर्षीय मुलाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. कुटुंबातील व्यक्तीने त्याची हत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Child murder in Kushinagar Express
Child murder in Kushinagar ExpressESakal
Updated on

कुशीनगर एक्सप्रेस ट्रेनच्या शौचालयात ५ वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलीस आणि रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुरतमध्ये मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाल्यानंतर सुरत पोलीस सतत मुलाचा शोध घेत होते. त्याचवेळी ट्रेनमध्ये मुलाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस आणि रेल्वेमध्ये खळबळ उडाली आहे. मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com