महिला प्रशिक्षणार्थींना केले विवस्त्र अन्...

महिला प्रशिक्षणार्थींना केले विवस्त्र अन्...

सुरत : गुजरातच्या भूजमधील गर्ल्स हॉस्टेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील महिला प्रशिक्षणार्थींना विवस्त्र करुन त्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच अविवाहित महिलांनाही अनेक विचित्र प्रश्न विचारण्यात आले आहे. 

सुरत महानगरपालिकेचे एक रुग्णालय असून, राज्य सरकारच्या अखत्यारित हे रुग्णालय येते. याबाबत एसएमसी कर्मचारी संघाने महापालिका अधिकाऱ्यांकडे घटनेची तक्रार दिली. या तक्रारीमध्ये सांगितले, की जवळपास 100 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना जेव्हा तपासणीसाठी नेण्यात आले तेव्हा त्यादरम्यान मोठा गोंधळ उडाला होता. महिला प्रशिक्षणार्थी क्लार्कला 10-10 च्या ग्रुपमध्ये उभे राहण्यास सांगण्यात आले. तेव्हा त्यांना कपडे काढण्यास सांगितले होते. 

खोलीत फक्त एक पडदा

जिथे महिलांची तपासणी करण्यात आली तेथील दरवाजाही नीट लावण्यात आला नाही. त्या खोलीत फक्त एक पडदा लावण्यात आला होता.

विचित्र प्रश्नांची विचारणा 

महिलांची ही चाचणी होत असताना येथील अधिकाऱ्यांकडून महिलांना विचित्र प्रश्नही विचारण्यात आले होते. अविवाहित महिलांनाही प्रश्न विचारण्यात आले होते, की त्या कधी गर्भवती राहिल्यात का? 

शारीरिक तपासणी महत्त्वाची

महिलांची शारीरिक तपासणी बंधनकारक आहे. ज्यांनी ही तपासणी घेतली त्यांना माहिती नव्हते की ही तपासणी फक्त पुरुषांची असते. कोणाला काही त्रास आहे का, याची माहिती यामधून घेतली जाते, अशी माहिती रुग्णालयाच्या स्री रोग विभागाचे प्रमुख आश्विनी वछानी यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com