Gujarat Crime : दोन दलित भावांची जमिनीच्या वादावरून हत्या

जमिनीच्या वादावरून दोन दलित भावांची हत्या केल्याची खळबळजनक घटना सुरेंद्रनगर जिल्ह्यात समधियाला गावात बुधवारी घडली.
murder
murderesakal

सुरेंद्रनगर (गुजरात) - जमिनीच्या वादावरून दोन दलित भावांची हत्या केल्याची खळबळजनक घटना सुरेंद्रनगर जिल्ह्यात समधियाला गावात बुधवारी घडली. अलजीभाई परमार (वय ६०) आणि मनोज परमार (वय ५४) अशी त्यांची नावे असून काल रात्री उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.

चुडा तहसीलतर्गंत समधियाला गावात अलजीभाई परमार आणि मनोज परमार या दोघांवर काल दुपारी वीस ते बावीस जणांनी धारदार शस्त्रांने हल्ला करण्यात आला. यासंदर्भात पोलिस अधीक्षक हरेश दुधात यांनी म्हटले, की दोन गटात जमिनीचा वाद होता. हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.

आरोपी हे काठी दरबार समुदायातील असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी २० ते २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ६ जणांची ओळख पटली आहे. या हल्ल्यात काही महिला देखील जखमी झाल्या आहेत. १९९८ पासून जमिनीच्या हक्कावरून न्यायालयात खटला सुरू आहे. परंतु कनिष्ट न्यायालयाने दलित समुदायाच्या बाजूने निकाल तेव्हा त्यास आव्हान देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com