संदीप सिंहने कोणत्या भाजप नेत्याला 53 कॉल केले आणि का? काँग्रेस नेत्याचा भाजपला सवाल

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 30 August 2020

यासाठी संदीप सिंह यांच्या कंपनीला निवडण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थितीत करत अंमली पदार्थ आणि बॉलिवूड कनेक्शन यांसंदर्भातील चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या भाजपची भूमिका ही शंकास्पद असल्याचा दावा सचिन सावंत यांनी केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा गुंता वाढत असताना राजकारणही तापताना दिसत आहे. भाजप-काँग्रेस पक्षातील नेते या प्रकरणावरुन एकमेकांवर टीका करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन सावंत यांनी या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 1 ते 23 सप्टेंबर 2019 दरम्यान बॉलिवूडचे दिग्दर्शक संदीप सिंह यांनी महाराष्ट्र भाजप कार्यालयात 53 वेळा कॉल केला होता. ते कोणत्या विषयावर कोणाशी बोलले याची चौकशी व्हायला हवी, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. 

देशात कोरोनाचा कहर; राज्यात नव्या रुग्णांच्या आकड्याने गाठला उच्चांक

प्रसारमाध्यमातील वृत्ताचा दाखला देत सचिन सावंत यांनी संदीप सिंह लंडनला पळून जाऊ शकतो, अशी भिती देखील व्यक्त केली आहे. संदीप सिंह यांचे भाजपसोबत अधिक दृढ संबंध होते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गुजरात सरकारने संदीप सिंह यांच्या लिजेंड ग्लोबल स्टूडिओ कंपनीसोबत 177 कोटी रुपयांचा करार केला होता, याकडेही त्यांनी लक्षवेधण्याचा प्रयत्न केलाय. यासंदर्भात त्याने एक ट्विट केले आहे.   

होयबांची सरशी (श्रीराम पवार)

यासाठी संदीप सिंह यांच्या कंपनीला निवडण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थितीत करत अंमली पदार्थ आणि बॉलिवूड कनेक्शन यांसंदर्भातील चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या भाजपची भूमिका ही शंकास्पद असल्याचा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. 2018 मध्ये अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात संदीप सिंह यांचे नाव आले होते. त्याची मैत्रीण रियाचे जे व्हॉट्सअपवरील संदेश समोर येत आहेत ते भाजप काळातील आहेत, असे सांगत सचिन सावंत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.  
अनलॉक-4: 169 दिवसानंतर मेट्रो धावणार, जाणून घ्या केंद्र सरकारची नवी नियमावली

65 दिवस काँग्रेस शांत का होती?

सचिन सांवत यांनी भाजपवर केलेल्या आरोपानंतर भाजपनेही त्यांच्यावर पलटवार केलाय. सावंत यांना बिन बुडाचे आरोप करण्याची सवय आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांकडे होता. त्यावेळी संदीप सिंह यांची चौकशी का केली नाही? असा प्रश्न भाजप नेते राम कदम यांनी केलाय. काँग्रेस रियाच्या प्रवक्त्या असल्याप्रमाणे भूमिका मांडत असून तिला वाचवण्याचा प्रयत्न का होतोय? असा प्रश्नही कदम यांनी उपस्थितीत केलाय. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात नव-नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन आणि संदीप सिंह याच्या विरोधात अनेक तक्रारी येत असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते. याप्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सीबीआयला निवदन करणार असल्याची माहितीही अनिल देशमुख यांनी दिली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case sandeep singh called 53 times with Wich bjp leader sachin sawant question