युवकाच्या गुप्तांगाला लावली आग अऩ्...

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

एका जमावाने युवकाच्या गुप्तांगाला आग लावली असून, युवकाचा तडफडून मृत्यू झाला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तिरुअनंतपुरम (केरळ): एका जमावाने युवकाच्या गुप्तांगाला आग लावली असून, युवकाचा तडफडून मृत्यू झाला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तू फक्त आजची रात्र थांब ना...

केरळमधील त्रिवेंद्रम येथील थम्पनूर परिसरातील मध्यावर्ती बस स्थानकाजवळ शुल्लक कारणावरून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अजेशवर (रा. थिरुवल्लूम वय 30) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, दोन जण फरार आहेत. अटक करण्यात आलेले सर्वजण रिक्षाचालक आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

युवती म्हणते, माझ्या होणाऱया बाळाचे चार बाबा...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'अजेश हा बस स्थानकात थांबला होता. यावेळी एका व्यक्तीचे पाकिट व मोबाईल चोरीला गेला होता. अजेशने चोरी केल्याचा संशय होता. रिक्षाचालकांनी अजेशला बेदम मारहाण केली व गुप्तांग पेटवून दिले. याघटनेत अजेशचा तडफडून मृत्यू झाला. अजेशला मारहाण होत असताना उपस्थितांपैकी कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारे पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.'

पत्नीला म्हणालो, मला मेहुणी आवडते मग काय...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspected robber beaten to death at kerala