

BJP leader Suvendu Adhikari’s personal assistant Chandranath Rath was shot dead in Madhyamgram, triggering political tensions between BJP and TMC in West Bengal.
esakal
पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे एका खळबळजनक गुन्ह्याची घटना उघडकीस आली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ही हत्या तृणमूल कॉंग्रेसने केल्याचा आरोप भाजपने केला आहे तर, तृणमूल कॉंग्रेसने याबाबत सीबाआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.