
बीएचयूच्या राजशास्त्र विभागात ही घटना घडली. या विभागात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह वीर सावरकर आदी अनेक मोठ्या नेत्यांचा तसबिरी लावण्यात आल्या आहेत
वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) वीर सावरकर यांच्या छायाचित्राचे विद्रुपीकरण करण्यात आल्याची घटना समोर आल्याने मंगळवारी तणाव निर्माण झाला होता. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा
काय घडले कसे घडले?
बीएचयूच्या राजशास्त्र विभागात ही घटना घडली. या विभागात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह वीर सावरकर आदी अनेक मोठ्या नेत्यांचा तसबिरी लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या सावरकरांच्या तसबिरीवर शाई फेकून तिचे विद्रूपीकरण करण्यात आल्याची बाब मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. याची माहिती विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला कळविली. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले. विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून, घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीएचयूमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
बनारस हिंदू विद्यापीठ आणि वाद!
दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाप्रमाणे बनारस हिंदू विद्यापीठही कायम चर्चेत असते. विद्यापीठात यापूर्वीही अनेक वाद निर्माण झाले आहेत. मध्यंतरी फिरोज खान यांनी संस्कृत शिकवून नये, म्हणून तेथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. मुळात फिरोज खान हे राष्ट्रीय संस्कृत संस्थानात शिकलेले होते. त्यांची संस्कृत प्राध्यापक म्हणून, नियुक्ती झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशात बनारस येथे हे विद्यापीठ असून, विद्यापीठात सुमारे 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथे विद्यार्थ्यांसाठी 75 वसतीगृहे आहेत. विद्यापीठाला बीएचयू नावाने ओळखले जाते.
आणखी बातम्या वाचा